कर्नाटकमधल्या महर्षि वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री बी नागेंद्र यांना सक्तवसुली संचालनालयानं आज चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
अनुसूचित जमाती विकास महामंडळातील १८७ कोटी रुपये बेकायदा हस्तांतरीत करण्यात आले. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये २० ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आज माजी मंत्री बी नागेंद्र यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.