डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 26, 2024 10:25 AM | WHO

printer

मद्य सेवनाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं दक्षिण-पूर्व आशियाई देशांना आवाहन

कोणत्याही स्वरूपातील, दारू आणि तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं जाहीर करावं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिणपूर्व आशियातल्या सदस्य देशांना केलं आहे. तसंच तंबाखू उत्पादनांचा अवैध व्यापार थांबवण्यासाठी निर्णायक कृती करणे आवश्यक आहे यावर जोर दिला आहे. बँकॉकमध्ये आयोजित प्रादेशिक कार्यशाळेत काल संघटनेच्या प्रादेशिक संचालिका सायमा वाजेद यांनी तंबाखूचा अवैध व्यापार आणि मद्य सेवनाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचं आवाहन केले.तंबाखू उत्पादनांमधील बेकायदेशीर व्यापार दूर करण्यासाठी सर्व सदस्य राष्टांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाकू नियंत्रणावरील नियमावलीमध्ये सहभागी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तंबाखू सेवनामुळे कर्करोग, श्वास आणि हृदय रोगाच्या संख्येत वेगानं वाढ झाली असल्याचं आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. दारूच्या जागतिक विक्रीपैकी 50 टक्के खपाची कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचं ही संघटनेनं नमूद केल आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा