मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये तसंच दुर्गम भागांमध्ये आज पोलिसांनी छापेमारी करत शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत विविध कलमांतर्गत ४७ जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त असून विविध जिल्ह्यांमध्ये १०२ ठिकाणांवर पोलिसांनी नाकेबंदी करत चौक्या उभारल्या आहेत.
Site Admin | July 22, 2024 2:49 PM | Manipur
मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये तसंच दुर्गम भागांमध्ये पोलिसांनी छापेमारी करत राबवली शोधमोहीम
