भारत स्टार्टअप उद्योगांची मांदियाळी असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री जितिन प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत डिजिटल भारत इकॉनॉमी कॉन्क्लेव्हला ते संबोधित करत होते. ते म्हणाले की गेल्या १० वर्षात दर ४० मिनिटांनी एक या वेगानं स्टार्टअप उद्योग देशात सुरु झाले आहेत. एकूण एक लाख ४० हजार स्टार्टअप्स पैकी किमान ४५ टक्के उद्योगांचं नेतृत्व महिलांकडे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली.
Site Admin | August 29, 2024 3:49 PM