डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 7, 2024 10:47 AM

printer

भारत औषधनिर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी

भारत वाजवी दरात जागतिक दर्जाचे औषधोपचार मिळणारं केंद्र म्हणून उदयास येत असून औषधनिर्मिती क्षेत्रातही अग्रस्थानी आहे असं केंद्रिय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत जागतिक वैद्यकीयतंत्रज्ञान परिषदेत बोलत होते.

 

भारताच्या भविष्यकालीन धोरणात प्रतिबंधात्मक औषधोपचाराला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आलं आहे असं सांगून त्यांनी आरोग्य विज्ञान क्षेत्रातल्या विकास आणि संशोधनासाठी जैव तंत्रज्ञान विभागानं केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या क्षेत्रातली गुंतवणूक गेल्या दहा वर्षात तेरा पटींनी वाढल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योग समुह आणि संशोधन संस्था यांच्यात चांगला मेळ साधण्याचं आवाहन जितेंद्र सिंग यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा