भारतीय शेअऱ बाजारात कालच्या पडझडी नंतर आज सकाळच्या सत्रात वाढ पहायला मिळाली. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समध्ये ९७३ अंकाची वाढ झाली आणि तो ७९ हजार ५६६ अंकांवर पोहोचला. नंतर दुपारी ५८५ अंकांनी घसरुन ७९ हजारावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीहीतही सकाळच्या सत्रात २२१ अंकांची वाढ होऊन तो २४ हजार २१३ वर पोहोचला आहे.
Site Admin | August 7, 2024 1:49 PM
भारतीय शेअऱ बाजारात आज सकाळच्या सत्रात वाढ
