डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारताचा जीडीपी वाढीचा दर चालू वर्षात ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील असा मूडीजचा अंदाज

भारताचा जीडीपी वाढीचा दर चालू वर्षात ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील असा अंदाज मूडीज या पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे. यापूर्वी या वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ६ पूर्णांक ८ दशांश टक्के राहील असा मूडीजचा अंदाज होता. २०२५ साठीचा सुधारित अंदाजही मूडीजने प्रसिद्ध केला आहे. पुढच्या वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांऐवजी ६ पूर्णांक ६ दशांश टक्के राहील असं सुधारित अंदाजात म्हटलं आहे. २०२४च्या पहिल्या तिमाहीत  भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ७ पूर्णांक ८ दशांश टक्के दरानं झाली. औद्योगिक आणि सेवा क्षेत्राने लक्षणीय वाढ नोंदवल्याचं मूडीजचं निरीक्षण आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा