भारतीय रिझर्व बँकेनं काल एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी परकीय चलन साठा व्यवस्थापनाबाबतचा ४३ वा अर्धवार्षिक अहवाल प्रकाशित केला. १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारताकडे एकूण ६८८ अब्ज २७ कोटी अमेरिकी डॉलर्स इतका परकीय चलन साठा असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी २००४ मध्ये अर्धवार्षिक अहवालाचं संकलन आणि त्याचं सार्वजनिक स्वरूपात प्रसारण करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. देशाच्या परकीय चलन साठ्याचं व्यवस्थापन अधिक पारदर्शक बनवणं, हे याचं उद्दिष्ट आहे.