भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या मालकीच्या कारमुळे काल मध्यरात्री नागपुरात काही गाड्यांना झालेल्या अपघाताबाबत पोलीस योग्य तो तपास करत आहेत. पण केवळ बावनकुळे यांना अडकवण्यासाठी या गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. अनिल देशमुख यांच्यावर होत असलेली कारवाई ही सीबीआय करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | September 10, 2024 6:38 PM | DCM Devendra Fadnavis
बावनकुळे यांना अडकवण्यासाठी गोष्टीचं राजकारण करू नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
