बांगलादेश मध्ये, मुहम्मद युनूस यांच्या हंंगामी सरकारनं आज जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबीर या विद्यार्थी संघटनेवरची बंदी उठवली आहे. बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबीर यांचा दहशतवाद आणि हिंसाचारात सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा उल्लेख या अधिसूचनेत करण्यात आला आहे. म्हणून, दहशतवाद विरोधी कायदा, २००९ च्या कलम १८ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत, सरकारनं जमात, शिबीर आणि त्याच्या प्रमुख संघटनांवर बंदी घालणारं पूर्वीचं परिपत्रक मागे घेतलं आहे. हा निर्णय तात्काळ लागू होईल, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.
Site Admin | August 28, 2024 6:46 PM | Bangladesh | Jamaat-e-Islami & Islami Chhatra Shibir