लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून हे उपाहारगृह तसंच लाँड्री उभारण्यात आली आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून साकारलेले बैठक कक्ष हे वैशिष्ट्य असलेल्या या या उपहारगृहासोबतच इथल्या लाँड्रीची पूर्ण व्यवस्था शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेले खुल्या कारागृहातले कैदी पाहणार आहेत आहे. लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून इथं काम करणाऱ्या बंद्यांना वेतन दिलं जाणार आहे.
Site Admin | June 30, 2024 10:07 AM | बंदीजन पुनर्वसन | लातूर जिल्हा कारागृह