सिंगापूर इथं सुरु असलेल्या फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत, भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली नववी फेरीही अनिर्णित राहिली. दोन्ही बुद्धीबळपटू ५४ चाली खेळल्यानंतर ही फेरी अनिर्णित ठेवण्यावर सहमत झाले. दोघांनाही प्रत्येकी साडेचार गुण मिळाले असून या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकण्यासाठी दोघांना प्रत्येकी ३ गुणांची आवश्यकता आहे. आज विश्रांतीचा दिवस असून दहावी फेरी उद्या खेळली जाणार आहे. यानंतर दोन्ही खेळाडूंचे गुण समान असतील तर फास्टर टाईम कंट्रोल अंतर्गत त्यांची फेरी होईल आणि त्यातून विजेत्याची घोषणा केली जाईल.
Site Admin | December 6, 2024 4:51 PM | FIDE World Chess C’ship 2024