डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 14, 2024 10:47 AM

printer

प्रादेशिक भाषांमध्ये कायदा शिकवला जाण्याची सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सूचना

“कायद्याची तत्त्वं सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगता येत नसतील, तर कायदेशीर शिक्षणात आणि व्यवसायात त्रुटी आहेत” असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. काल लखनौ इथल्या डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात बोलतांना चंद्रचूड यांनी प्रादेशिक भाषांमध्ये कायदा शिकवण्याच्या गरजेवर भर दिला.

 

कायदा शिकवताना आपण प्रादेशिक भाषांचाही विचार केला पाहिजे आणि डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने हिंदीमध्ये LLB अभ्यासक्रम सुरू करावा असं चंद्रचूड यांनी सुचवलं. सरन्यायाधीश या नात्याने आपण सामान्य लोकांसाठी न्याय प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी अनेक सूचना जारी केल्या असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालायाचे इंग्रजीतले निर्णय विविध भाषांमध्ये भाषांतरित केल्याने जनतेला ते समजल असल्याचं असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा