पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापिका डॉक्टर रोहिणी गोडबोले यांचं काल निधन झालं, त्या 72 वर्षांच्या होत्या. बंगळुरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन विभागात त्या कार्यरत होत्या. मुळच्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या रोहिणी गोडबोले यांचं प्राथमिक शिक्षण हुजुरपागा शाळेत झालं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विज्ञानजगतात महिलांचं स्थान सक्षम करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं, रोहिणी गोडबोले यांचं कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील, असं मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.