डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रस्ते सुरक्षा संदर्भात जागृती करावी – मंत्री नितीन गडकरी

नागपूर जिल्ह्यातल्या अपघात प्रवण ठिकाणी सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासन, वाहतूक तसंच रस्ते बांधणी यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय राखणं आणि लोकसहभाग वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी हे आज नागपूर जिल्हा सुरक्षा समिती बैठकीत सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अपघात प्रवण ठिकाणी सुधारणा घडवून आणण्यासाठी सेव लाईफ फाउंडेशन तसंच इतर स्वयंसेवी संस्थांनी सुचवलेल्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत अशी सूचनाही त्यांनी केली. अपघातानंतर पिडीतांची सुटका, पिडीतांना वैद्यकीय मदत यासाठी प्रशिक्षिांची यंत्रणा उभारावी, शालेय विद्यार्थी तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनांचा आढावा घ्याव्या, पदपथांवरचं अतिक्रमण हटवावं, असे निर्देशही त्यांनी दिले.
नागपूर जिल्हा तसंच महानगरपालिका प्रशासन, नागपूर पोलीस आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रस्ते सुरक्षा संदर्भात जागृती करावी असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर इथं जिल्हा रस्ते सुरक्षा बैठकीत ते बोलत होते. प्रशासन, वाहतूक यंत्रणा आणि सर्व रस्ते बांधणी संस्थांनी समन्वय साधून अपघातप्रवण स्थळांची सुधारणा करावी असंही गडकरी म्हणाले. या बैठकीत रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेने नागपूरमध्ये झालेल्या अपघातांची तसंच त्यावरल्या उपयांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या बैठकीला जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा