डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून विक्रेत्यांना आतापर्यंत ८,६०० कोटी रुपयांचा निधी वाटप

प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू झाल्यापासून केंद्रानं विक्रेत्यांना आतापर्यंत आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप केलं असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल दिली. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक तत्वंही जारी करण्यात आली.

दिल्लीत काल, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या वतीनं रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचं प्रशिक्षण आणि जागरुकता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या विक्रेत्यांसाठी असलेले शंभर रुपयांचं नोंदणी शुल्क प्राधिकरणानं माफ करावं, जेणेकरून अधिकाधिक विक्रेत्यांना नोंदणी करण्यास प्रोत्साहन मिळेल असा सल्लाही नड्डा यांनी दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा