डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन्ह चिन्ह यांच्यात द्विपक्षीय बैठक

व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन्ह चिन्ह यांचं आज सकाळी नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. फाम मिन्ह चिन्ह भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांबरोबर द्विपक्षीय बैठक घेणार असून, दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. व्हिएतनामचे प्रधानमंत्री आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर २०१६ मधल्या व्हिएतनाम दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधले ऐतिहासिक संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारमध्ये परिवर्तित झाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा