इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुधारणावादी नेते आणि माजी आरोग्यमंत्री मसूद पेजस्कियान विजयी झाले आहेत. त्यांनी इस्लामी मूलतत्त्ववादी सईद जलीली यांचा पराभव केला. काल दुसऱ्या फेरीत झालेल्या मतदानात एकूण तीन कोटी मतांपैकी पेजस्कियान यांना १ कोटी ६३ लाख मतं पडली. इराणची निवडणूक २०२५ मध्ये होणार होती, मात्र मे महिन्यात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं अपघाती निधन झाल्यानं निवडणूक घेण्यात आली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेजस्कियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि इराणमधील संबंध दृढ आणि वृद्धिंगत करून उभय देशांच्या नागरिकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करण्याची अपेक्षा मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केली.
Site Admin | July 6, 2024 8:30 PM | पेजस्कियान | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी