डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इटली इथं सुरु असलेल्या पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं काल पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उप उपांत्यपूर्व फेरीत त्यानं ॲलेसेंड्रो जियानेसीचा ०-६, ७-५, ७-६ असा पराभव केला.

आज संध्याकाळी पुरुष दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा जर्मन जोडीदार आंद्रे बेगेमन यांचा सामना नेदरलँड्सच्या जेस्पर डी जोंग आणि रायन निजबोअर यांच्याशी होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा