डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुण्यामध्ये अंमली पदार्थ प्रकरणी बेकायदेशीर पबवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

 

महाराष्ट्रात पुण्यामध्ये अंमली पदार्थ प्रकरणी बेकायदेशीर पबवर कठोर कारवाई करण्याचे आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दूरध्वनी करुन मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले.

दरम्यान, या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. सूचना देऊनही लक्ष ठेवण्यात दिरंगाई केल्याबद्दल दोन पोलिस अधिकारी आणि दोन अंमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही संदीप गिल यांनी दिली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा