मंकीपॉक्स विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत. सिंगापूर आणि दुबई इथून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी पुणे विमानतळावर गेल्या सहा दिवसांत करण्यात आली. यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या प्रवाशांची तपासणी केल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. संशयित रुग्णांच्या तपासणीचा अहवाल महापालिकेकडे पाठवण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
Site Admin | August 25, 2024 12:37 PM | monkeypox
पुण्यात मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर सिंगापूर आणि दुबई इथून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी
