पुण्यात आणखी आठ जणांना झिकाची बाधा झाली आहे; त्यामध्ये दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. पुण्यातल्या झिका रूग्णांची संख्या आता 45 झाली आहे. झिकाबाधित रुग्णांच्या इतर गुंतागुंतीच्या तपासण्याही आरोग्य विभाग करत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिलं आहे. एकीकडे झिका रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे. या महिन्यात डेंग्यूचे 11; तर चिकनगुनियाचे 8 रुग्ण आढळून आले असल्याचं महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितलं.
Site Admin | July 29, 2024 9:53 AM | झिका | पुणे