पुढचे पाच दिवस गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि तामिळनाडू इथंही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, जम्मू, काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये पुढच्या पाच दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Site Admin | July 16, 2024 8:11 PM | Rain
पुढचे पाच दिवस मध्य महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि केरळात मुसळधार पावसाची शक्यता
