डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षितता यांच्याद्वारे शाश्वत विकास धोरणांसाठी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

पंधराव्या कृषी नेतृत्व समिती २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल नवी दिल्लीत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ लाख हेक्टरवर झाडं लावण्याच्या तसंच पाच टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय राज्यानं घेतल्याची माहिती दिली. पीक विमा योजनेत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं सांगत सिंचन प्रकल्पाद्वारे १७ लाख हेक्टर सिंचन क्षमतेचं ध्येय निश्चित केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा