पंडित कुमार गंधर्व स्मृती महोत्सव आजपासून दोन दिवस मध्यप्रदेशात देवास इथं आयोजित करण्यात येत आहे. या समारंभात प्रसिद्ध गायिका विदुषी सुधा रघुरामन यांना कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देशाच्या विविध भागातल्या कलाकारांचे कार्यक्रम महोत्सवात होणार आहेत. त्यात शांतनु गोखले यांचं तबला वादन, शुभदा पराडकर यांचं गायन, नीलाद्रीकुमार यांचं सतार वादन यांचा समावेश आहे.
Site Admin | August 24, 2024 3:00 PM | देवास | पंडित कुमार गंधर्व स्मृती महोत्सव | मध्यप्रदेश
पंडित कुमार गंधर्व स्मृती महोत्सवाचं दोन दिवस मध्यप्रदेशात देवास इथं आयोजन
