राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी शिक्षण मंत्रालयाने गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक काल झाली. विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेणं, हे समितीचं पहिलं प्राधान्य असून, त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाईल, असं समितीचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं. विद्यार्थ्यांचा तणाव आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक मजबूत प्रणाली स्थापन करण्याचा समितीचा विचार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. परीक्षेतल्या गैरव्यवहारांना आळा घालून कार्यक्षमता सुधारणं, सुरक्षेच्या नियमावलीत सुधारणा, तसंच संस्थेची रचना आणि कार्यपद्धतीचं पुनरावलोकन करण्याची शिफारस करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे.
Site Admin | June 25, 2024 1:39 PM | NEET