राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA नं काल राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा अर्थात नीट युजी परीक्षेच्या सुधारित अंतिम गुणपत्रिका प्रसिद्ध केल्या आहेत. नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल आणि गुणपत्रिका पाहता येतील.
या परीक्षेत 17 उमेदवारांनी पहिला क्रमांक पटकावला असल्याची माहिती एनटीएनं दिली आहे. यावर्षी 5 मे रोजी देशातील 571 शहरांमधल्या 4750 हून अधिक केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला 24 लाखांच्यावर विद्यार्थी बसले होते. परीक्षेवेळी ज्या 1563 विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला होता, त्यांची 23 जूनला फेरपरीक्षा घेण्यात आली .