डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 24, 2024 3:12 PM

printer

नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे हा तपास सोपवण्यात आला असून सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  नीट-यूजी पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी विविध यंत्रणांनी विविध राज्यांतून अनेक संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.

अतिरिक्त गुण मिळालेल्या  विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल झाली. एकंदर ८१३ विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिल्याची, तर साडेसातशे विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिली आहे.

 दरम्यान, विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कालची नीट-पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची पुढची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ८ जुलै रोजी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा