नीट परीक्षेच्या वादात राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. भारतीय व्यापार प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे एनटीएच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
दरम्यान नीट परीक्षा 2024 मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून सहा जणांना अटक केली आहे. संशयितांना देवीपूर पोलीस स्टेशन परिसरात एम्स-देवघर परिसरात पकडण्यात आलं. बिहार पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील लातूर इथही दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून ते लातूरमधून खाजगी शिकवणी वर्ग चालवतात.