नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं आहे. गंगापूर धरणातला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या यावेळेपेक्षा दोन टक्के जास्त असला तरी जिल्ह्यातल्या २४ जलाशयात मिळून ६१ पूर्णांक ६२ शतांश टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातल्या पालखेड धरणात ६६ टक्के आणि दारणा धरण समुहात ८६ टक्के इतका पाणीसाठा आहे. गिरणा धरणातही ७३ टक्के इतका पाणीसाठा आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जलसंपदा विभागानं पाण्याचा विसर्ग कमी केला असून सध्या गंगापूरमधून ४७० तर दारणा धरणातून ५ हजार ३५६ आणि नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १५ हजार २७४ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
Site Admin | August 6, 2024 4:05 PM | गंगापूर धरण | नाशिक | पाणीपुरवठा
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ८७ टक्के भरलं
