नवी दिल्ली इथं या महिन्याच्या १४ ते २४ दरम्यान आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेचं आयोजन केंद्र सरकारतर्फे केलं जाणार आहे. प्रथमच, आशिया-प्रशांत प्रदेशात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमात ३ हजारांपेक्षा जास्त नेते आणि १९० हून अधिक देशांतील तंत्रज्ञान तज्ञ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 6G, कृत्रीम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा, सायबर सुरक्षा, मशीन-ते-मशीन संवाद आणि क्वांटम तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रातील तंत्रज्ञान मानकांचं भविष्य घडवणं हे या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.