डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्रात नगरपंचायत आणि एका नगर परिषदेतल्या मिळून 11 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होणार

महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती, एका नगरपरिषदेतल्या सदस्य पदांच्या ११ रिक्त जागांसाठी, येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोल्हापूराच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणुकीही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. मतमोजणी १२ ऑगस्ट ला होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार २१ जुलै वगळून दिनांक १८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर २५ जुलै ला अर्जांची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे. रायगड मधल्या खालापूर आणि पाली, नाशिकमधल्या निफाड आणि सुरगाणा, जळगाव इथल्या बोदवड, नंदूरबार मधून धडगाव-वडफळ्या-रोषमाळ, सांगली इथल्या कवठेमहांकाळ आणि खानापूर, कोल्हापूरमधल्या चंदगड तसंच यवतमाळ इथल्या बाभूळगाव या नगरपंचायतींमध्ये सदस्य पदाच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी, तर नागपूर मधल्या कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या एका जागेसाठी ही निवडणूक होत आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा