६८व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं उद्या १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरदरम्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशाच्या कुशीनगर इथले भिख्खु संघाचे अध्यक्ष भदंत ए. ए. बी. ज्ञानेश्वर आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती दीक्षाभूमीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली.
Site Admin | October 9, 2024 8:22 PM | Nagpur
धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनानिमित्त नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन
