धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज मंत्रालयात आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यासंदर्भात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यानं आक्रमक पवित्रा घेत झिरवाळ यांच्यासह इतरांनी मंत्रालय प्रांगणातल्या पहिल्या मजल्यावरच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. पोलिसांनी या सर्वांना जाळीबाहेर काढल्यावर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.
Site Admin | October 4, 2024 5:34 PM | dhanga | Dhangar Reservation
धनगर आरक्षणावरून नरहरी झिरवळ यांचं मंत्रालयात आंदोलन
