डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 15, 2025 1:39 PM

printer

देशात गेल्या दहा वर्षात मत्स्यउत्पादनात दुप्पट वाढ

देशाच्या मत्स्यउत्पादनात मोठी वाढ झाली असून गेल्या दहा वर्षात ते दुप्पट झालं आहे, असं मत्स्यव्यवसाय मंत्रालयानं सांगितलं आहे.

 

भारत आता जगातला दुसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश झाला असून जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा ८ टक्के आहे, वर्ष २०१३-१४ मधल्या ९५ लाख टनांवरून २०२३-२४ मध्ये ते १८४ लाख टन इतकं झालं आहे. 

 

केंद्र सरकारनं मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वाधिक २ हजार ७०३ कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा