देशाच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या गावांमधील स्थलांतर रोखण्यासाठी तिथं रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण करणं आवश्यक असून या भागात आरोग्यसेवा, इंटरनेट पुरविणं आणि तिथल्या पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
काल त्यांनी नवी दिल्ली इथं व्हायब्रंट व्हिलेज योजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या गावांमध्ये तैनात करण्यात आलेल्या सशस्त्र सेना दलाच्या तुकड्यांनी स्थानिक पोलिस दलाच्या मदतीनं स्थानिक रहिवाशांना शेती तसंच हस्तोद्योग उत्पादनासाठी मदत करावी, असंही ते म्हणाले.