देशाच्या दक्षिण भागात पुढचे पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्राचा पुढचा भाग, गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमध्ये पुढे सरकला आहे आणि पुढच्या काही दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि अंदमान-निकोबार बेटांवर तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशात पुढचे पाच दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमध्ये या कालावधीत जोरदार ते अतिजोरदार पाऊस कायम राहील. दरम्यान, उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडचा भाग, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि दिल्लीच्या तुरळक भागात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती आज आणि उद्या कायम राहील आणि त्यानंतर पारा खाली येईल.
Site Admin | June 24, 2024 3:04 PM | Weather Update