भारत आर्थिक विकासाच्या संदर्भात महत्वपूर्ण संरचनात्मक बदलाच्या उंबरठ्यावर असून सातत्यपूर्ण पद्धतीने 8 टक्के वृद्धी दराच्या दिशेने वाटचाल करत आहे. असं रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे. मुंबईत काल बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 188 व्या वार्षिक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारताची विकास गाथा ही बहु-क्षेत्रीय आहे आणि पुढेही राहील. यामध्ये वस्तू आणि सेवा कर अग्रस्थानी असलेल्या विविध संरचनात्मक सुधारणांचं महत्वाचं योगदान आहे असं ते म्हणाले. इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतात जीएसटी खूप वेगाने स्थिरावल्याचं सांगून ते म्हणाले मासिक जीएसटी संकलन 1 लाख 7 हजार कोटी रुपयांवर पोहोचले असून, व्यवसायातही सुलभता आली आहे असं दास् यांनी नमूद केलं.
Site Admin | June 26, 2024 10:07 AM | RBI | Shaktikant Das