वर्ष २०१४ ते २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीत भाजपा सरकारनं साडे बारा कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यामुळं भारत हा जगात सर्वाधिक प्रमाणात रोजगार निर्माण करणाऱ्या देशांपैकी एक बनला आहे, अशी माहिती भाजपाच्या प्रवक्त्यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार आणि त्यांची राजकीय इच्छाशक्ती यामुळे हे शक्य झालं आहे. युपीए सरकारच्या काळात दहा वर्षात केवळ २ कोटी ९० लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या, असंही ते म्हणाले.
Site Admin | July 11, 2024 8:44 PM | BJP
दहा वर्षांच्या कालावधीत भाजपा सरकारनं १२.५ कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या – भाजपा प्रवक्ते
