डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 20, 2024 2:07 PM

printer

दहशदवादी संघटनांना केलं जाणारं अर्थसाहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताच्या उपाययोजनांची जागतिक आर्थिक कृती गटाकडून प्रशंसा

जागतिक आर्थिक कृती गटाने भारतातल्या जम्मू काश्मीरमध्ये आयसिस आणि अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचा इशारा दिला असून, दहशदवादी संघटनांना केलं जाणारं अर्थसाहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा देखील केली आहे. यासंदर्भात एफ ए टी ए ने गेल्या वर्षी नोव्हेंबेरमध्ये केलेल्या भारताच्या दौऱ्यानंतर याबद्दलचा अहवाल काल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारत १९४७ पासून दहशदवादाशी सामना करत असून जम्मू काश्मीरमध्ये अजूनही दहशदवादाचा धोका कायम असल्याच त्यात म्हटलं आहे. मात्र तो रोखण्यासाठी आणि युवकांना दहशदवादाच्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी भारताने सुरू केलेल्या, सही रास्ता यासारख्या योजनांची यामध्ये प्रशंसा करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा