तेलंगणामधल्या मुसी पुनरुज्जीवन प्रकल्पाला विरोध म्हणून भाजपाने काल ‘मुसी निद्रा’ आंदोलन केलं. भाजपा नेत्यांनी या आंदोलना अंतर्गत मुसी नदी परिसरातल्या गरीब कुटुंबासोबत एक रात्र मुक्काम केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष किशन रेड्डी यांनी सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातल्या तुलसीराम नगर इथल्या कुटुंबासोबत मुक्काम केला. राज्य सरकार मुसी नदी परिसरातली गरीबांची घरं विस्थापित करण्याची योजना आखत आहे, मात्र भाजपा इथल्या रहिवाश्यांच्या सोबत आहे, असं रेड्डी म्हणाले.
Site Admin | November 17, 2024 3:13 PM | BJP | Telangana
तेलंगणामधल्या मुसी पुनरुज्जीवन प्रकल्पाला विरोध म्हणून भाजपाचं ‘मुसी निद्रा’ आंदोलन
