सरकारनं तूर, हरभरा आणि काबुली चणा यांच्या साठ्यावर नियंत्रण घातलं आहे. ग्राहकांना रास्त भावात डाळी मिळाव्यात आणि साठेबाजी किंवा अन्य गैरप्रकार होऊ नयेत यासाठी शासनानं हे पाऊल उचललं आहे. घाऊक तसंच किरकोळ व्यापारी, डाळ मिलचे मालक, बहुशृखंला किरकोळ विक्रेते, आणि आयातदार या सगळ्यांनाच हा निर्णय लागू आहे. ही साठेमर्यादा ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत लागू राहणार आहे.
Site Admin | June 21, 2024 8:30 PM