तुर्किए सरकारनं देशात इंस्टाग्राम या समाज माध्यमाच्या वापरावर कालपासून बंदी घातली. मेटा या इंस्टाग्रामच्या मूळ कंपनीनं हमासचे प्रमुख इस्माइल हानिया यांच्या निधनाच्या बातमीवर व्यक्त करण्यात आलेल्या शोकसंदेशांवर बंदी घातल्याचा आरोप तुर्किेए सरकारनं केला आहे. तुर्किएच्या राष्ट्रपतींचे संवाद संचालक फहार्टिन अल्टुन यांनी इंस्टाग्रामवर टीका केली असून तुर्किए सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कायम आदर करेल, असं म्हटलं आहे.
Site Admin | August 3, 2024 12:50 PM
तुर्किए देशात कालपासून इंस्टाग्रामला बंदी
