अन्याय आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी तरुणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं हर घर दुर्गा हे अभियान मोलाची भूमिका बजावेल; असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल मुंबईत व्यक्त केला. कुर्ला इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा या अभियानाची सुरुवात बिर्ला यांच्या उपस्थितीत करण्यात आली; त्यावेळी ते बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देणात येणार आहे. यावेळी अभिनेत्री अदा शर्मा यांनी युवतींना स्वसंरक्षणाचं महत्त्व सांगणारं प्रात्यक्षिक देखील सादर केलं.