अमेरिकेत विविधता, समता, आणि समावेशन कार्यक्रमांसाठी सरकारी निधी कमी करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला फेडरल न्यायाधीशांनी स्थगिती दिली आहे.
हा आदेश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन करत असून खटला सुरू असेपर्यंत तो स्थगित राहील असं बाल्टिमोरमधले न्यायाधीश ॲडम अबेलसन हा निर्णय देताना म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्याच दिवशी या आदेशावर स्वाक्षरी केली होती.