परिशिष्ट-२ जाहीर झाल्यानंतर झालेली झोपड्यांची हस्तांतरणं मान्य करण्याची कोणतीही तरतूद प्रचलित शासन निर्णयामध्ये नसल्यामुळे मुंबईतल्या बहुसंख्य झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्याची तयारी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दर्शवली. याबाबत अधिवेशन काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक उच्च स्तरीय बैठक बोलावण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
Site Admin | July 2, 2024 3:56 PM | अतुल सावे | झोपडपट्टी पुनर्वसन | विधानसभा
झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्याची तयारी – मंत्री अतुल सावे
