झारखंडमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बदलल्याबद्दल केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे झारखंडचे प्रभारी शिवराज सिंग चौहान यांनी झारखंड मुक्ती मोर्चावर टीका केली आहे.
विरोधकांनी आपल्याला खोट्या आरोपांमध्ये अडकवून तुरुंगात डांबलं, असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला होता, त्याला उत्तर देताना चौहान यांनी सांगितलं, की, भाजपा कोणालाही त्रास देत नाही किंवा पाठीशीही घालत नाही.