जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलनात जुलै महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० पूर्णांक ३ शतांश टक्के वाढ झाली असून ते एक लाख ८२ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. जुलै महिन्यात करदात्यांचे परतावे दिल्यानंतर वस्तू आणि सेवाकराचं निव्वळ संकलन एक लाख ६० हजार कोटी रुपये इतकं आहे, जे १४ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांनी वाढलं आहे. वित्त मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एकूण परताव्यांमध्ये १६ हजार २८३ कोटी रुपयांची घट झाली असून हे प्रमाण १९ पूर्णांक ४ दशांश टक्के इतकं आहे. देशांतर्गत व्यवहारांमध्ये वाढ हे वस्तू आणि सेवाकर महसूल संकलनातल्या वृद्धीचं मुख्य कारण आहे. याच काळात आयाती मधून मिळालेल्या महसुलात १४ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ झाली असून ते ४८ हजार ३९ कोटी रुपये झालं आहे.