जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेदातील नवोन्मेष अशी नवव्या आयुर्वेद दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे. अशी घोषणा आयुष मंत्रालयाचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केली. 29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे त्याती सुरुवात काल जाधव यांच्या हस्ते झाली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. जागतिक आरोग्य प्रणालीमध्ये आयुर्वेदाच्या योगदानाची क्षमता दर्शवण्यासाठी आयुर्वेदातील नाविन्यपूर्ण उपचार पध्दती कशी उपयोगी आहे याचे महत्व ही संकल्पना अधोरेखित करते. असंही ते म्हणाले. आयुर्वेद दिवस दरवर्षी धन्वंतरी जयंतीच्या मुहूर्तावर साजरा केला जातो. 2016 पासून दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. हा उत्सव भारतीय पारंपारिक औषध प्रणाली आणि आरोग्यसेवा संस्कृतीच्या प्रणालीचा एक अपरिहार्य भाग म्हणून आयुर्वेदाच्या प्रचारासाठी भारताची वचनबद्धता दर्शवतो.
Site Admin | September 28, 2024 10:16 AM | आयुर्वेद दिवस | मंत्री प्रतापराव जाधव