छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीनं राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमातून पक्षानं दिलेले ११ ठराव मांडण्याचे आणि त्या ठरावाचे बॅनर शहरातल्या मुख्य चौकात लावण्याचे निर्देश पक्षानं दिले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी आरक्षणाची प्रामाणिक आणि प्रभावीपणे १०० टक्के अंमलबजावणी करावी, असा ठराव वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण हक्क परिषदेत करण्यात आला. “खाजगीकरणात आरक्षणाची” तरतूद करावी यासाठी लढा उभारण्याचा ठरावही या परिषदेनं केला.
आरक्षणाचं प्रमाण लोकसंख्येतल्या टक्केवारीइतकं असावं, नोकरी आणि शिक्षणातल्या जागांची उपलब्धता वाढवावी, जातीनिहाय जनगणना करावी, आणि त्या आधारे ओबीसींचं राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करावं, गेल्या एक वर्षात दिलेली “कुणबी” जात प्रमाणपत्रं रद्द करावीत, मायक्रो ओबीसींसाठी रोहिणी आयोग लागू करावा, मुस्लिमांसाठी ५ टक्के शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करावं, इत्यादी ठराव या परिषदेनं केले आहेत.